विद्यार्थी मित्रांनो सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे त्याचबरोबर स्पर्धेचे देखील आहे दिवसेंदिवस विज्ञान प्रगती करत आहे परंतु ग्रामीण भाग अजूनही विज्ञानापासून वंचित आहे या दृष्टिकोनातून बालमनावर विज्ञान उच्चविण्यासाठी शालेय जीवनापासून तयारी गरजेची आहे त्यामुळे उत्तुंगतेच फाउंडेशन मार्फत उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे कारण या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन देशासाठी विज्ञानवादी पिढ्या घडवण्यास मदत होईल या उद्देशाने इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीची ही परीक्षा आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो),आयआयटी, आयआयएम यासारख्या उच्च संस्थांना विनामूल्य सहलीला नेण्यात येते. पुस्तके व विज्ञान साहित्य बक्षीस स्वरूपात देण्यात येते.
उत्तुंगतेज फाऊंडेशन मागील 5 वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक,सामाजिक तसेच विज्ञान क्षेत्रात कार्य करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवून भविष्यात विज्ञानवादी पिठ्या घडविण्यासाठी वाटचाल सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून 2019 मध्ये डॉ. अब्दुल कलाम बालविज्ञान संस्कार केंद्र सुरू केले, यामार्फत विद्यार्थ्याना प्रयोगातून विज्ञान तसेच शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्न विद्यार्थ्याच्या मनात रुजवित आहोत. आपल्या देशात शास्त्रज्ञांची संख्या बघावी तशी कमी आहे.त्यामुळे ग्रामीण भागात जेव्हा विज्ञान रुजेल तेव्हाच डॉ.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ताक भारत घडेल.या संकल्पनेतून 2021ला "मला शास्त्रज्ञ व्हायचं चळवळ" सुरू केली. या चळवळीच्यामाध्यमातून विशेषतः खेड्यांतील विद्यार्थ्यांच्या बाल मनावर विज्ञान रुजविण्याचा उद्देश आहे.ही चळवळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात,गाव - खेड्यात पोहोचविण्यात शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांचे सहकार्य फार गरजेचे आहे.खर तर पालक जस वागतो यावर विद्यार्थी कसा वागतो हे अवलंबून आहे.त्यामुळे चला आपण सर्व एकत्र येऊन ही चळवळ यशस्वी करूया. उत्तुंगतेज फाऊंडेशन मार्फत गेली काही वर्षापासून असे अनेक उपक्रम सुरू आहेत जेणेकरून ,पालक व विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग राहिला आहे.यात पालकशाळा हा महत्त्वाचा उपक्रम चालू आहे. याच बरोबर उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा द्वारे इस्रो,आय आय टी ,आय आय एम यांसारख्या उच्च संस्थांना भेट देण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांना भेटीसाठी नेले जाते.यामुळे विद्यार्थी त्या तशी स्वप्न बघायला सुरुवात करतात.ही एक महाराष्ट्रातील विज्ञान क्षेत्रातील अभिनव परीक्षा आहे.
आपल्या वयोगटानुसार अर्ज करा.
Kindly Conatact at below maintione address/mail/Mobile
DR Colony, Jawala Bazar, Tq. Aundha Dist. Hingoli
Support@uysc.in
ramuhalge123@gmail.com
+91 9579692009
+91 8788724470